spot_img
spot_img
spot_img

मुंबईमध्ये ३१ जुलैला १४ तासांसाठी पाणीपुरवठा होणार बंद

श्रावणी खानविलकर । मुंबई । 30 जुलाई 2025

पाण्याच्या लाईनच्या देखभाल व काही दुरुस्तीच्या कामांमुळे मुंबईतील काही भागांमध्ये गुरुवारी १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. हे काम करण्याचा कालावधी गुरुवार सकाळी ९ वाजेपासून ते शुक्रवार सकाळी ११ वाजेपर्यंत असणार आहे.

या कालावधीत बांद्रा आणि खार येथील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. काही भागांमध्ये पाण्याचा दाब कमी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन पार्क मार्ग क्रमांक १ ते ४, पाली हिल आणि च्युईम गावाचा काही भाग येथे दुपारी २ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नर्गिस दत्त मार्ग, पद्मश्री देव आनंद मार्ग (झिगझॅग रोड) येथे रात्री १० ते मध्यरात्र १ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाली माला मार्ग या भागात सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच, कांटवाडी, पाली नाका, पाली गावठाण, शेरली, राजन आणि माळा गाव अशा काही भागांमध्ये पाण्याचा दाब कमी राहणार आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या