श्रावणी खानविलकर । मुंबई । 25 जुलाई ,2025
केंद्र सरकारने सॉफ्ट पॉर्न कंटेंटवर मोठी कारवाई केली आहे. उल्लू अॅप, ALTT अॅप यांसारख्या तब्बल २५ अॅप्सवर बंदी आणण्यात आली आहे. ही कारवाई माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत केली आहे.

कोरोनाकाळात पॉर्न वेबसाईट्सवर बंदी आल्यावर अनेक कंपन्यांनी सॉफ्ट पॉर्नसदृश कंटेंट तयार करण्यास सुरुवात केली होती. या कंटेंटमध्ये केवळ तरुणच नव्हे तर इतर वयोगटातील प्रेक्षकांचाही समावेश दिसून आला.
या कंटेंटचा तरुण पिढीवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे निरीक्षणात आले असून, या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठीच केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सची यादी:
एएलटीटी (ALTT)
उल्लू (Ullu)
बिग शॉट्स ॲप (Big Shots App)
डेसिफ्लिक्स (Desiflix)
बूमेक्स (Boomex)
नवरासा लाईट (Navrasa Lite)
गुलाब ॲप (Gulab App)
कंगन ॲप (Kangan App)
बुल ॲप (Bull App)
जलवा ॲप (Jalwa App)
वॉव एंटरटेनमेंट (Wow Entertainment)
लूक एंटरटेनमेंट (Look Entertainment)
हिटप्राइम (Hitprime)
फेनिओ (Fenio)
शोएक्स (Showflix)
सोल टॉकीज (Soul Talkies)
अड्डा टीव्ही (Adda TV)
हॉटएक्स व्हीआयपी (HotX VIP)
हलचल ॲप (Halchal App)
मूडएक्स (MoodX)
निऑनएक्स व्हीआयपी (NeonX VIP)
फुगी (Fuggy)
मोजफ्लिक्स (Mojflix)
ट्रायफ्लिक्स (Tryflix)
सरकारने २५ अॅप्सवर बंदी आणली आहे. सरकारचा हा निर्णय नक्कीच अल्पवयीन मुलांसाठी आणि इतर तरुणांसाठी फायदेशीर ठरेल.



